शिंदे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ ।  कधीकाळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे नेते रामदास कदम सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे. आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण रामदास कदम यांच्या दोन मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम हे योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये भागिदार आहेत. या कंपनीने मुंबईच्या कांदिवलीत इमारतीचा पुनर्विकास करताना कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी आता 15 जूनला होणार आहे.

रामदास कदम यांच्या दोन मुलांच्या कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मेसर्स योगीसिद्धी डेवेलपर्स या कंपनी विरोधात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, रामदास कदम यांचे दोन्ही मुले योगेश कदम आणि सिद्धेश कदम दोन्ही योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये पार्टनर आहेत. या कंपनीने कांदिवली स्थित सिटीएस 147 वर एसआरए योजनेअंतर्गत सुमुख हिल्स नावाच्या इमारतीचा पुर्नविकास केला आहे. मात्र या इमारतीमध्ये कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा याचिकेत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सोमवारी या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र याचिकाकर्त्याला सुनावणी पूर्वी एक लाख रुपये जमा करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी याचिकाकर्त्याला तीन आठवड्यांची मुद्दत देण्यात आली आहे. याप्रकरणीं पुढील सुनावणी 15 जून रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्ता तर्फे वकील प्रज्ञा तळेकर यांनी युक्तिवाद केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम