शिंदे सरकारचा मोठा निर्णय : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मे २०२३ ।  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ट्विटदेखील केलं आहे.

कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला. आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे. यासह उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम