शिंदे गट २५ रोजी उडवू शकतो युतीचा बार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ नोव्हेबर २०२२ ।राज्याच्या राजकारणात ठाकरे गट विविध पक्षातील नेत्यांची भेट घेत असतांना शिंदे गट हि मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी विविध ठिकाणी ताकद दाखवीत आहे.

याच दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दोन दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेतही दिलेत. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी कोणते वळण घेत ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे आंबडेकर-ठाकरे युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. शिंदे गट आणि दलित पँथरची युती होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ही युती होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबरला कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटासोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ शिंदे गटाला भेटून युतीचा प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं जातय. ठाकरे- आंबेडकर युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम