शिंदे गटाच्या नेत्याने मान्य केल : ठाकरेंनी आम्हाला घडवलं,

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे गट यांच्यातील वाद सातत्याने उफाळून येत असतानाच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षचिन्हाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना नक्की न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, यावर निकाल देताना एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे. असे मत यावेळी बोलताना रामदास कदम यांनी व्यक्त केले.

ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. जी काही अक्कल ती ठाकरेंनाच, आम्ही सगळे बेअक्कल आहोत. असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे कुटुंबावर केला. ‘बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं, शून्यातन उभं केलं. शून्यातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली. ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना’ या घोषवाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला जन्म दिला आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर मोठी केली. ती हिंदुत्ववादी शिवसेना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि सोनिया गांधींबरोबर गहाण ठेवली.’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात बोलताना मान्य केलं की, शिवसेना ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आणि त्यांचे विचार संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे देखील यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले. त्यांनी शिवसेना शरद पवारांकडे गहान ठेवली आहे. आम्ही भाजपात प्रवेश करू पण मरेपर्यंत भगवा झेंडा सोडणार नाही.’ असा इशारा देखील यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाला दिला. त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करत आहेत. त्यात ते जेवढे बोलत आहेत, तेवढा त्यांचा पक्ष कमी होत आहे. त्यामुळे त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे हे आता आपण ठरवायचे आहे. सुप्रीम कोर्टातील निकाल आल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल त्यांच्या जवळचे अनिल परब त्यांना किती फसवत आहेत.’ असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम