शिंदे गटाच्या आमदाराची घसरली जीभ राऊतांना म्हणाला ‘कुत्रा’
दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ । राज्यात पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करीत असतांना कुत्रा असा शब्द वापरला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हि टीका केली आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या प्रश्नावरुन संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बोम्मई महाराष्ट्राच्या कानफाटात वाजवतात आणि आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात, अशी टीका आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना संतोष बांगरांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पागल, पिसाळलेला कुत्रा आहे. संजय राऊतांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम