ठाकरेंवर हल्लबोल करीत धनुष्यबाण शिंदेंचा मिळणार ; नवनीत राणा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जानेवारी २०२३ । भाजपच्या अगदी जवळ असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री फडणवीस हे मनातले मुख्यमंत्री असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असा विश्वास खासदार नवनीत राणा यांना व्यक्त केला. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.

उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाईव्हवर सरकार अडीच वर्षे चाललं, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. फक्त हनुमान चालिसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला 13 दिवस या उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेबांचे विचारच जर त्यांच्या घरात ठेवले नाहीतर त्यांचं काय होईल? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

नवनीत राणा म्हणाल्या, ” सत्तासंघर्ष सध्या सुरु आहे. सत्ताचा काय संघर्ष आहे? जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत, ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांनाच धनुष्यबाण मिळेल असा विश्वास आहे. माझा देवावरचा विश्वास, हनुमान चालिसावर विश्वास आहे. बाळासाहेबांना मानणारे ज्यांच्याजवळ आहे, त्या एकनाथ शिंदेंना पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण मिळेल आणि त्या चिन्हावर ते आपले उमेदवार मैदानात उतरवतील, हा मला विश्वास आहे”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम