शिंदेंची शिवसेना लागली कामाला ; जम्बो कार्यकारिणी जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  राज्यात ठाकरे गटासह महाविकास आघाडी जोशात कामाला लागली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील कामाला लागल्याची चित्र दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून नवीन कार्यकारिणीमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिलासादायक निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. जवळपास दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांना पदाचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

अशी आहे महानगर कार्यकारिणी : नाशिक विधानसभा मतदारसंघात जिल्हा संघटक- योगेश चव्हाणके, उपजिल्हाप्रमुख- महेश जोशी, विधानसभा प्रमुख- रोशन शिंदे, उप जिल्हाप्रमुख- अमोल सूर्यवंशी, उपमहानगरप्रमुख- आनंद फरताळे, उप महानगरप्रमुख उमेश चव्हाण, जितेंद्र धनवटे, उप महानगर संघटक अमोल जोशी, गौरव पगारे, संदीप डहाणके, विनोद थोरात, पूर्व विधानसभा मतदारसंघात उपजिल्हाप्रमुख-दिगंबर मोगरे, विधानसभा प्रमुख बाबूराव आढाव, विधानसभा समन्वयक अमित खांदवे, उपमहानगरप्रमुख शिवा ताकाटे, उपमहानगरप्रमुख प्रवीण काकड, विक्रम कदम, पिंटू शिंदे, उप महानगर संघटक संदीप लभडे, हर्षल दाणी, गोकुळ मते, संजय काजळे.

पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघात उप जिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, समन्वयक बबलू सूर्यवंशी, दीपक मौले, उप महानगरप्रमुख योगेश पाटील, सुधाकर जाधव, आदित्य सरनाईक, अरुण घुगे, उपमहानगर संघटक प्रमोद जाधव, कल्पेश कांडेकर. देवळाली विधानसभा मतदारसंघात उपजिल्हा प्रमुख प्रमोद लासुरे, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया, विधानसभा समन्वयक विजय कातोरे, उपमहानगर प्रमुख विलास पाटील.
महानगर, युवा सेना पदाधिकारी : उपजिल्हाप्रमुख- श्याम साबळे, शशिकांत कोठुळे, उपजिल्हा समन्वयक सुनील वाघ, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, उप जिल्हाप्रमुख संदेश लवटे, उपजिल्हाप्रमुख विशाल खैरनार.
युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, युवतीसेना जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर, जिल्हा चिटणीस प्राची पवार, शीतल भवर, ऐश्वर्या उत्तेकर, स्वरूपा राऊत, अनुजा चव्हाण, योगिता ठाकरे, उप जिल्हाधिकारी हर्षदा दिवटे, पूजा महाजन, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, महानगर प्रमुख शुभम पाटील.
विविध सेलचे पदाधिकारी
– सहकार सेल प्रमुख- विशाल साळवे.
– लीगल सेल जिल्हाध्यक्ष- अॅड. अभय महादास, शहर प्रमुख अॅड. हर्षल केंगे.
– क्रीडा सेल जिल्हाप्रमुख- अशोक दुधारे.
– दिव्यांग सेना- शहर प्रमुख शंतनू सौंदानकर.
– झोपडपट्टी कामगार सेना जिल्हाप्रमुख- भिवानंद काळे, दिलीप आहिरे.
– ग्राहक संरक्षण कक्ष- पुंडलिक चौधरी.
– अल्पसंख्याक- मुश्ताक कुरेशी.
– आदिवासी सेना- दीपक गायकवाड.
– शिव अंगणवाडी सेना- कावेरी आत्रे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम