
शिरपूरचे प्रा. बाळासाहेब शिवाजीराव गुजर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
शिरपूरचे प्रा. बाळासाहेब शिवाजीराव गुजरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
जळगाव : शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेचप्रा. बाळासाहेब शिवाजीराव गुजर अर्थे) यांना यंदाच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. बाळासाहेब शिवाजीराव गुजर हे शेती व्यवसाय सांभाळून शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांच्या मेहनती, जिद्दी व चिकाटीमुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे अर्थे खुर्द गावाचे नाव उज्ज्वल झाले असून, समाजातही प्रेरणादायी ठरले आहेत. गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी प्रा. शिवाजीराव गुजर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम