गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा शिवभक्तांवर लाठीचार्ज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ । राज्यात आज तारखेनूसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक साेहळा स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर माेठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला किल्ले रायगडाच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहावयास मिळाली. दरम्यान, सोहळा संपन्न झाल्यानंतर मोठी गर्दी गडावरुन उतरण्यासाठी झाली असता पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

सोहळा संपन्न झाल्यानंतर नाणे दरवाजाच्या मार्गाने शिवभक्त खाली जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे गडावर मोठी गर्दी झाली. खाली उतरण्याच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मार्गावरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अर्धातासांपासून संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांना आव्हान करत आहेत. शिस्तिचं पालन करा. मात्र, शिवभक्तांनी त्यांचे आव्हान धुडकावून लावले. यामुळेचं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.सोहळ्यापूर्वीही, संभाजीराजेंनी एक ट्विट करत शिवप्रेमींनी गड चढण्याची गडबड करुन नये असे आवाहन केले होते. तसेच, सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही संभाजीराजेंनी शिवप्रेमींना केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम