स्व.बापुजी युवा फाऊंडेशन आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद प्रकाश पाटील व नगरसेविका सौ.समिक्षा लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून, स्व.बापुजी युवा फाऊंडेशनच्यावतीने सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते.

डोळ्याचे पारणे फेडणारे क्षण आपण मागील वर्षा प्रमाणे याही वर्षी जल्लोषात साजरा केला, यंदाही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंतीसाठी आकर्षक देखावा उभारण्यात आला होता, यावेळी शिवआरती भडगाव – पाचोऱ्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर श्रींना मानवंदना देण्यासाठी अष्टगंध ढोल-ताशा पथक, मोरया DJ – राजस DJ, नागाई लाईट्स-दोंडाईचा यांचे आयोजन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात जयंती संपन्न झाली.

शिवप्रेमींना आनंद देणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची आतुरता सर्व भडगावकरांना लागलेली होती. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला महिलांची तसेच सर्व समाज बांधवांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.

हा शिवजन्मोत्सव सोहळा देखणा आणि शिवप्रेमींना आनंद देणारा ठरला. यात शिवरायांच्यावर गीतांवर जल्लोषात नाचायचा मोह सर्व शिवप्रेमींनी घेतला.

हा सोहळा जल्लोषात व लक्षणीय ठरण्यासाठी स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे सर्व संचालक व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सूत्र संचलन प्रविण महाजन सर यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम