शिवसेना १३ खासदार पुन्हा मैदानं उतरणार ; खा.तुमाणेची माहिती !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. तर राज्यात देखील शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक जिल्ह्यातील जागेवर उमेदवाराचा शोध सुरु केला असतांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान 13 खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरतील, अशी माहिती आता समोर येत आहे. लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे यांची शिवसेनाही महायुतीतला घटकपक्ष म्हणून तयारीला लागले आहेत. यावर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे म्हणाले, आमचे विद्यमान तेरा खासदार हे लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यांनी याची जोमात तयारी सुरू केली आहे. आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने खासदार काम करत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. 13 खासदारांना मुख्यमंत्री शिंदेंनी निर्देश दिलेले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम