देशात परिवर्तनासाठी शिवसेना व प्रकाश आंबेडकर ; संजय राऊत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ राज्यात गेल्या दोन महिन्याआधी शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची घोषणा आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली होती पण ठाकरे गटाने आज पुन्हा यांच्यासोबत युतीची चर्चा सुरु केल्याची बातमी समोर आली आहे.

देशात व राज्यात परिवर्तन दिसण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आल्यास ते होवू शकेल व याची मविआलापूर्ण कल्पना आहे. कुणाचा विरोध आहे कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. मला असे वाटत नाही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो असे प्रकाश आंबेडकर ज्यांच्या मागे मोठा वंचित समाज उभा आहे, असे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात अनेक जण एकवटले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून कुणी रोखणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे देशात परिवर्तनाची नांदी सुरू होइल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे खूप सकारात्मक असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात काम करताय, म्हणून आमची अशही इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र यावी कारण ही महाराष्ट्रासह देशाची ताकद आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात सध्या ज्या प्रकारचे सत्ताकारण सुरू आहे ते उलथवायचे असेल तर या दोन शक्ती एकत्र येण गरजेचे आहे. आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या स्वागताला तयार आहोत. जोगेंद्र कवाडे आणि शिंदे गटाच्या युतीवर बोलण्यास मात्र राऊतांनी टाळले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम