कोळपिंप्रीच्या विद्यार्थ्यांना शिवशाही फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी) कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना (कै) विमलबाई प्रतापराव काटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) यांच्या मार्फत शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
माजी सरपंच सुभाष काटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक सूर्याजी काटे, माजी सरपंच भिकन काटे, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश काटे, माजी सरपंच संजीव पाटील, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल काटे, बी एस हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही ए पाटील, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष विजयकुमार काटे, धान्य दुकान समितीचे अध्यक्ष सुभाष काटे,जुलाल काटे, व्यवस्थापन समिती सदस्य गुलाब काटे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा विकास संस्थेचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल जे.काटे, माजी उपसरपंच सुनिल पी. काटे, ओम शांतीचे केंद्र संचालक प्रविण काटे, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम चौधरी, प्राथमिक शिक्षक सुनिल एम. काटे , प्राथमिक शिक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सुनिल काटे व सुभाष काटे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून आईवडिलांचे स्मरण करून त्यांचे ऋण निर्देश करणे ही काळाची गरज असल्याचे ही सांगितले. उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले. आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान शिवशाही फाऊंडेशन तर्फे पारोळा येथील उत्कर्ष प्राथमिक विद्यामंदिर व सडावण (ता अमळनेर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
—-
कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व शिक्षक

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम