नागरिकांना झटका : सकाळपासून पेट्रोल-डीझेलच्या भावात बदल !
दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ । संपूर्ण देश वाढत्या महागाईला त्रासलेला असतांना दिवसेदिवस पेट्रोल-डीझेलचे भाव गगनाला भिडत असतांना सर्व सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. तर आज बुधवारी १५ मार्च सकाळी अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान डब्ल्यूटीआय कच्च्या तेलात 0.86 टक्क्यांच्या वाढीनंतर हे प्रति बॅरल 71.94 डॉलरवर व्यापार करीत आहे. त्याच वेळी, ब्रेंट कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.68 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल $ 77.98 डॉलरवर व्यापार करीत आहे.
या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती वाढल्या
चेन्नईमध्ये आज पेट्रोल 11 पैसे आणि डिझेल 9 पैसे प्रति लीटर महाग होऊन 102.74 रुपये आणि 94.33 रुपयांनी प्रति लिटर डिझेल विकले जात आहे. तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 17 पैसे महाग होऊन 96.76 प्रति लीटर आणि 89.93 प्रति लीटर विकले जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैसे महाग होऊन 96.57 रुपये आणि 89.76 रुपये लीटरने डिझेल विकले जात आहे. त्याच वेळी पेट्रोल जयपूरमध्ये 98 पैस आणि डिझेल 90 पैसे स्वस्त होऊन 108.41 रुपये आणि 93.65 रुपयांनी डिझेल विकले जात आहे.
महानगरमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली- पेट्रोल. 96.72 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 89.62 रुपये
मुंबई- पेट्रोल रुपये 106.31 आणि डिझेल प्रति लिटर 94.27 रुपये
कोलकाता- पेट्रोल रुपये 106.03 आणि डिझेल प्रति लिटर 92.76 रुपये
चेन्नई- पेट्रोल रुपये 102.74 आणि डिझेल प्रति लिटर 94.33 रुपये
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम