शरद पवारांना धक्का ; खंदे समर्थक अजित पवारांच्या गटात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  गेल्या वर्षभरात शिवसेनेने पाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फुट पडली असून आता राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटात्तील दिग्गज नेत्याने अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काही घरेदेखील फुटली आहेत. त्याचाच प्रत्यय काल मंगळवारी पुन्हा आला. शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे घरदेखील फुटल्याचे मानले जात आहे. बळिराम साठे यांचे सुपुत्र जितेंद्र साठे आणि नातू जयदीप साठे हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. या संबंधितांनी मंगळवारी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सुनील तटकरे उपस्थित होते.

मोहोळचे आमदार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक यशवंत माने यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आहे. विशेषत्वे, या घटनेने बळिराम साठे यांना धक्का बसल्याच्या चर्चेचे मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उठले आहे. शिवाय सुरवातीला सुपुत्र आणि नातू यांना अजित पवार गटाकडे पाठवायचे त्यानंतर आपण स्वत:हून याच गटात सामील व्हायचे अशी खेळी खुद्द बळिराम साठे यांचीच असल्याच्या चर्चेचे वादळदेखील आता उठले आहे. बळिराम साठे यांनीच सुपुत्र आणि नातू यांना अजित पवारांकडे पाठविल्याचा सर्वत्र बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक व सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांचे चिरंजीव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे व नातू जयदीप साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यातून नव्या चर्चांना आता तोंड फुटले आहे. बळिराम साठे हे यापूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत भाजपत जाण्याच्या बेतात होते. मात्र, पुढे राजन पाटील यांचाच प्रवेश लांबल्याने बळिराम साठे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले. अजित पवार यांचा गट फुटल्यानंतर शरद पवार यांच्या गटासमवेत राहण्यातच बळिराम साठे यांनी धन्यता मानली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम