
उष्णतेमुळे हैराण : अशी वाढवा पंख्याची स्पीड !
दै. बातमीदार । ७ मार्च २०२३ । सध्या राज्यात उन्हाळ्याचा महिना सुरु आहे. प्रत्येकाच्या घरात कुलर असतोच असे नाही तर काही लोकांकडे फॅनदेखील असतो जर तुमच्या फॅनचा स्पीड कमी झाला असेल आणि तुम्ही उष्णतेमुळे हैराण होत असाल तर आज आम्ही तुम्हाला फॅन स्लो का होतो आणि तुम्ही तो कसा वाढवू शकता हे सांगणार आहोत. सहसा फॅनमध्ये असलेला कॅपेसिटर जुना होतो. जर त्याचा कॅपेसिटर बदलला तर तो पुन्हा नव्या पंख्याप्रमाणे वेगाने धावू लागेल. वास्तविक, कॅपेसिटर पंख्याच्या वेगाशी जोडलेला असतो, त्यामुळे त्यात थोडासा दोष असला तरी तो त्याचा वेग मंदावतो. याशिवाय पंख्याचे नट बोल्ट सैल असले, त्याचे ब्लेड्स एकाच कोनात नसले तरी पंख्याचा वेग कमी होतो.
दुसरीकडे पंख्याचा वेग कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या सर्विस वेळेवर न करणे. पंखा बंद पडेपर्यंत आपण त्याकडे लक्षच देत नाही. परिणामी पंख्याचा वेग कमी होतो.
खुल्या आणि थेट हवेच्या ठिकाणी पंखे बसवणे टाळा. मोकळ्या जागेत पंखा लावल्याने त्याच्या वेगात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्याचा वेग कमी होतो. याशिवाय पंखा मोकळ्या हवेत लावल्यास त्यात जास्त धूळ साचते, त्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो. अनेक ठिकाणी वीजपुरवठ्यात जास्त ट्रिपिंग होते, त्यामुळे पंख्याच्या वेगावर परिणाम होऊन वीजपुरवठा सतत वाढतो किंवा कमी होतो. अशावेळी लाईट ट्रिपिंग होत असल्यास फॅन न वापरण्याचा प्रयत्न करा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम