धक्कादायक खुलासा : सीमाने मंदिरात नव्हे तर हॉटेलात केले लग्न !
दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून आपल्या प्रेमासाठी आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाने चर्चा रंगली आहे. मात्र सुरुवातीला प्रेमासाठी देश सोडून आलेल्या सीमाविषयी सर्वाना कुतूहल वाटले परंतु आता सीमाचे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या गुप्तहेर संघटनांशी संबंध असल्याचा संशय बळावत चालला आहे.
नुकतीच तिची एटीएसकडून १२ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रेमप्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे कारण सीमा हैदरचे नाव घेत देशात पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सध्या तिच्या बद्दल अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अश्यातच एक महत्वाची माहिती हाती लागली असून, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सीमा हैदर हिने अत्यंत काळजीपूर्वक उत्तर भारतातील महिलांचा पेहराव केला होता. तसेच सुरक्षा दलांची नजर चुकविण्यासाठी तिने तिच्या मुलांनाही अशाच प्रकारचे कपडे घातले होते. मानवी तस्करीतून भारत- नेपाळ सीमा ओलांडताना महिलांना विशेषत: घरगुती मोलकरणी वाटावे, असेच कपडे घालण्याची ही पद्धत वापरली जाते. हे सर्व करण्यासाठी तिने स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली असावी, असं गुप्तचर सूत्रांचं म्हणणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सीमा हैदर ही १३ मे २०२३ रोजी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
सीमा आणि सचिन यांनी नेपाळच्या पशुनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. सीमा आणि सचिन थांबलेल्या विनायक हॉटेमधून ही माहिती समोर आली आहे. हॉटेल मालक गणेश यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी बोलताना हॉटेल मालक गणेश म्हणाले की, जेव्हा सीमा आणि सचिन आमच्या हॉटेल मध्ये राहण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी खोली नंबर २०४ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही खोली बुक केली होती. सचिन नेपाळमध्ये एक दिवस आधी आला होता. त्यानंतर सीमा तिथे पोहोचली. दोघं जेव्हा बाहेर जायचे तेव्हा सीमा जीन्स आणि टी शर्टमध्ये असायची. त्यामुळे ती चार मुलांची आई असेल याबाबत शंका आली नाही. असं तो म्हणाला. सचिन आणि सीमा हैदर तब्बल सात दिवस हॉटेल मध्ये राहिले असून, त्यांनी हॉटेलच्या खोली नंबर २०४ मध्येच लग्न केलं. त्यांचं लग्न खोलीतच झालं आहे. त्यामुळे या दोघांनी पशुपतीनाथ मंदिरात लग्न केलच नाही. ती भारतातील तपास यंत्रणांना खोटं सांगत आहे.’ असंही हॉटेल मालक गणेश यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आता हॉटेल मालक गणेश यांच्या या माहितीनंतर आणखी कोणते नवीन खुलासे समोर येतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम