क्रिकेट विश्वातील धक्कादायक बातमी ; ‘या’ खेळाडूचे झाले निधन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जून २०२३ ।  जगभरात क्रिकेट हा खेळ मोठ्या ताकदीने खेळला जात असतो तर या खेळाचे लाखो प्रेक्षक देखील आहेत. या बातमीने क्रिकेट प्रेक्षकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा झटका बसलाय. पीटर एलन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पीटर एलन एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या गोलंदाज होते. वयाच्या 87 व्या वर्षी पीटर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे.

पीटर एलन हे क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत ते क्वीन्सलँडकडून खेळत होते. त्यांच्या जाण्याने मोठे दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर देखील ते 1985 ते 1991 पर्यत ते क्वीन्सलँड क्रिकेट असोशिएशनशी जोडलेले होते. माहितीनुसार, 2000 साली त्यांना ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स मेडलने सन्मानित करण्यात आलं होत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम