भुसावळात रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑगस्ट २०२३ | भुसावळ शहरातील जामनेर रोड लगत असलेल्या वाल्मीकनगरामध्ये दि. २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हवेमध्ये दोनवेळा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि गावठी कट्टा जप्त केला आहे.

याप्रकरणी विकेश श्याम सारवान ऊर्फ विकी किशोर टाक (वय ४२) याला अटक केली आहे. त्याने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तुलाने हवेत गोळीबार केली. त्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भवन आव्हाड यांच्या आदेशाने हे कॉ. विजय नेरकर, महेश चौधरी, रमण सुरळकर, सचिन चौधरी, सुनील जोशी, नीलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी दोन रिकामे काडतूस आढळून आले. तसेच आरोपीला अटक करण्यात आली. त्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ. विजय नेरकर करत आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम