जळगावात हवेत गोळीबार : एलसीबीने घेतले एकास ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ ।  जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात एक इसमाने गोळीबार केल्याची घटना दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किसन नजनपाटील यांना माहिती पडताच त्यांनी लागलीच आपल्या पथकाला याची माहिती देत संशयिताला अटक करीत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजी नगराच्या मागील बाजूस असलेल्या हुडको परिसरात दि.17 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अवैध अग्नीशस्त्रातून फायर केल्याची बातमी मिळाली त्यावरुन संशयित आरोपीच हुडको शिवाजीनगर जळगाव भागात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सखाराम बागुल, (वय 32, रा. शिवाजी नगर हुडको) असे सांगीतले. त्यावर त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे कडील अवैध अग्नीशस्त्रातून फायर केल्याचे सांगुन गुन्ह्याची कबूली दिल्याने त्यास अवैध अग्नीशस्त्रासह ताब्यात घेवुन गुन्ह्याचे पुढील तपासकामी जळगाव शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी विरुध्द जळगाव शहर पो.स्टे. ला 210/2023 भादवि कलम 307,34 आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पो.नि.विलास शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोउपनिरी गणेश वाघमारे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, प्रितम पाटील, विजय पाटील, जितेंद्र पाटील, सचिन महाजन प्रमोद ठाकूर सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम