श्री बालाजी कोटेक्स येथे काटापुजन संपन्न

नवीन कापुस करिता 7155 चा भाव

बातमी शेअर करा...

पारोळा

शहरातील जिनिंग क्षेत्रात अव्वल असलेल्या श्री बालाजी कोटेक्स येथे सालाबादाप्रमाणे कापुस काटा पुजन आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी श्री बालाजी कोटेक्स व ओम नमःशिवाय जिनिंगचे संस्थापक, संचालक, कर्मचारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, विविध गावांचा ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विकासोचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, पारोळा शहरासह परिसरातील व्यापारी बांधव, पत्रकार बांधव व शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम