श्री सम्मेद शिखर पावन भूमीला पर्यटन स्थळ घोषित केल्याचा विरोधात अमळनेर सकल जैन समाजाच्या मूक मोर्चा ….
अमळनेर (आबिद शेख) अमळनेर जैन समाजाचा मूक मोर्चा सराफ बाजार जैन मंदिरापासून निघाला तिथून राणी लक्ष्मीबाई चौक सुभाष चौक स्टेट बँक पासून भागवत रोड पुढ़े बस स्थानका पासून धुळे रोड पर्यंत व तहसील ऑफिस येथे माननीय तहसीलदार सो मिलिंदजी वाघ यांना निवेदन दिले,
या मोर्चाचे नेतृत्व श्रीओसवाल जैन संघाचे अध्यक्ष घेवरचंद कोठारी, श्री दादावाडी जैन संघाचे अध्यक्ष संजय भाऊ गोलेछा, श्री वर्धमान जैन स्थानक संघाचे अध्यक्ष भिकचंद खीवसरा, शितलनाथ जैन संघा चे अध्यक्ष महेंद्रलाल कोठारी, गुजराती संघाचे अध्यक्ष डॉ. किशोर गुजराती, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र जैन, तेरापथ जैन संघाचे अध्यक्ष राजेश बेदमुथा, कच्छी दशासंघा चे अध्यक्ष श्री विपुलभाई डागा, तसेच प्रा अरुण कोचर यांनी केले,
मोर्चात वयोवृद्ध सदस्य श्री प्रसन्नचंद जी बाफना श्री जेठमल जी कोचर व श्री बजरंग सेठ अग्रवाल पण उपस्थित होते।
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत कोठारी, रोनक संकलेचा , प्राध्यापक सुभाष ओसवाल, विजय पारख रमेश कोठारी निलेश शहा शितल कोठारी योगेश छाजेड गिरीश शहा विजय छाजेड कल्पेश बागरेचा भिकचद छाजेड मिलिंद शहा डॉ संजय शहा गौतम शहा विक्रम शाह महेंद्र जैन महावीर पहाडे कीर्तन कोठारी तसेच सर्व संघाचे महिला मंडल सदस्य सौ संगीता छाजेड विजया देसडा संगीता पारख सुनंदा कोठारी मोर्चा अमळनेरतील सर्व जैन बंधू भगिनी मुले मुली असंख्य संख्येने उपस्थित होते।
तसेच अंमळनेर तालुका जवळील खेड्यातील जैन बंधू-भगिनी पण असंख्य संख्येने उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम