राखीची नक्कल करीत शर्लिन घेतला समाचार; व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ तुम्ही नक्की महिलांचे वाद विवाद बघत असाल पण हे वाद आपल्या गल्लीत मर्यादित नव्हे तर बॉलीवूड क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आहेत याचेच ताजे उदाहरण म्हणजे साजिद खान बिग बॉसमध्ये दाखल झाला आणि अचानक शर्लिन चोप्रा प्रकाश झोतात आली. तिने वांरवार साजिदला बिगबॉसमधुन काढण्याचीही मागणी केली. #metoo अंतर्गत झालेल्या आरोपावरुन साजिद खान विरुद्ध तिचं म्हणणं नोंदवायला गेल्यावर मुंबई पोलीसात तिची तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने बाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला होता.

 

ड्रामा क्वीन राखी सावंतने शर्लिन चोप्रावरच गंभीर आरोप केले होते. तिने शर्लिन चोप्राची खिल्ली उडवली. एका व्हिडिओमध्ये राखी शर्लिनने साजिदवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना दिसत आहे. तिने शर्लिनची नक्कल करून तिची छेड काढली. इतकच नाही तर तिच्यावर गंभीर आरोपही केले होते. त्यात ‘आता 6 महिने थांबा, ती आणखी एक बलात्काराची केस आणेल. राखी पुढे म्हणाली की, आधी स्वतःला सुधारा आणि मग इतरांना सुधारा’ असं सल्लाही तिने शर्लिनला दिला होता. राखींने शर्लिनची पार लाजच काढलीय.

आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शर्लिन कुठे मागे राहणार होती. तिने राखीला चांगलच सुनावलं. राखीने जशी तिची नक्कल केली होती तशीच नक्कल करत ती म्हणाली, “हा काय मूर्खपणा आहे? जिममध्ये जा आणि जरा वेटलिफ्टिंग कर बॉडी बनंव.” राखीची नक्कल करत तिने असेही सांगितले की, आदिलच्या आधी तिचे सर्व बॉयफ्रेंड आणि पती टाईमपास होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम