भाजप सत्तेवर आल्यापासून वातावरण दुषित ; सुप्रिया सुळे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जून २०२३ ।  गेल्या काही महिन्याआधी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती पण शिवसेनेत झालेल्या बंडामुळे पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आली आहे. त्यानंतर राज्यात विरोधक व सत्ताधारीमध्ये मोठा वाद सुरु आहे. यात आता शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमुळे जनता घाबरली आहे आणि हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देशातून भारतीय जनता पक्षाला विरोध होत आहे. हे आता भाजपच्या लक्षात आलं असेल.” दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच तीव्र आंदोलन सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मोर्चा काढत गर्दी केली. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये दगडफेक देखील झाली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम