नोरानं पंतप्रधानाचे मानले आभार ; कारण…
बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | गेल्या दशकभरापासून बॉलीवूडमध्ये सक्रिय झालेल्या नोराची सध्या एका पोस्टमुळे खूपच चर्चा होताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं आणि डान्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नोराचा चाहतावर्ग मोठा आहे. नोरानं नेहमीच तिच्या लूक्सनं चाहत्यांना भुरळ घातली आहे.
नोरानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले आहे. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. मोरक्कोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर मोदींनी आपत्कालीन मदतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे जगभरातून कौतुक होत आहे. त्याबद्दल नोरानं मोदींचे आभार मानले आहे.
मोरोक्कोत ६.८ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर जगभरात खळबळ उडाली. या भुकंपात आत्तापर्यंत २००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही मोरक्कन वंशाची असल्यामुळे तिच्यासाठी ही बातमी हृदयद्रावक असल्याचे समजते आहे. या भूकंपानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी x वर पोस्ट करत मृत्युमुखी पडलेल्या मोरक्कन नागरिकांसाठी शोक व्यक्त केला आहे. ” मोरक्कोत भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. या अडचणीच्या काळात माझ्या भावना मोरक्कन लोकांसोबत आहेत. ज्यांनी प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, आणि त्यासाठी शक्य तेवढी मदत मोरक्कोला देऊ”, असे ट्विटमध्ये म्हणले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम