साहेब बंड तुमच्या घरातून झाल ; छगन भुजबळ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  राज्यात राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी एकेकाळी शरद पवारांनी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची साथ घेवून आपल्या पक्षातील अनेक दिग्गजांना निवडूण आणले पण गेल्या आठ दिवसापासून शरद पवारांनी ज्यांना मोठे केले त्यांनी त्याचाच घात केल्याने पुन्हा एकदा शरद पवार आपला पक्ष मोठा करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या मतदार संघात त्यांच्या विरोधात रणशिंग फुकले आहे. शरद पवारांनी काल झालेल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर टिका केली.

याला आज भुजबळांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाबाबत बोलताना हे का झालं याचा विचार करण्याा सल्ला भुजबळांनी पवारांना दिला आहे. भुजबळ म्हणाले की, “हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे.” शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले.

२०१४ साली भाजपने निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेला सोडलं तेव्हा पवार म्हणाले होते की तुम्ही शिवसेनेला सोडलं की आम्ही काँग्रेसला सोडू आणि निवडणुकीनंतर काही महिन्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये प्रवेश होईल.तुम्ही पाहिलं की काँग्रेसपासून देखील आम्ही दूर झालो आणि शिवसेनाला भाजपासून दूर केलं आणि आम्ही स्वतंत्र्य लढलो. त्यानंतर कमी संख्या असल्याने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा अचानक पाठिंबा कायम धरू नका असे सांगितलं. पण या चर्चेत मी नव्हतो. यामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि शरद पवार हेच चर्चा करत होते, असेही छगन भुजबळ म्हणाले.

शरद पवार यांच्या येवला येथील कालच्या सभेचं नियोजन ज्यांनी केलं होतं ते माणिकराव शिंदे यांची शिस्तभंग केल्यावरून पक्षाने जानेवारी २०२० साली हकालपट्टी केली आहे. दोन महिने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली होती. काढलं त्यांचं पक्षासाठी काही योगदान नाही. येवल्यासाठी देखील काहीच योगदान नाही. पण दुसरे कोणी भेटले नाहीत तर त्यामुळे त्यांचं सहकार्य घेतलं असा असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम