उन्हाळ्यात रात्रीची झोप उडाली ; घरच्या घरी करा उपाय !
दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ । सध्या राज्यात बदलत्या हवामान असल्यामुळे कधी वादळी पाऊस तर कधी तप्त उन सुरु आहे. अशातच राज्यातील महावितरणची लाईट ये जा होत असल्याने रात्रीच्या वेळी तुमची झोप उडत असेल अशा वेळी तुम्हाला नकळत डासांची संख्या वाढायला लागते आणि एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात.
घराच्या आजुबाजूला असलेला कचरा, गवत आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे डास आपल्या कानाशी सतत गुणगुणत असतात.
डास चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग होते आणि आपली चिडचिड व्हायला लागते. इतकेच नाही तर डास चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत.
डास हे केवळ झाडं, साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही डासांचे प्रमाण वाढू शकते. याबरोबरच माश्यांचे प्रमाणही या दिवसांत वाढलेले असते. यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरीकांना त्याच्या उग्र वासाने त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? म्हणूनच घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
१. एका ताटलीमध्ये एक गोलाकार स्टँड ठेवा.
२. त्यामध्ये ८ ते १० कडूनिंबाची पाने, २ तमालपत्र आणि ४ लवंगा घाला.
३. यामध्ये कापूर आणि मोहरीचे तेल घाला.
४. काडेपेटीची काडी लावून ती त्यामध्ये ठेवून द्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम