
स्मार्ट सिटी महागल्या ; घरभाडे दरात मोठी वाढ !
दै. बातमीदार । ९ जून २०२३ । देशातील अनेक लोकांचे स्वप्न असते कि, मोठ्या शहरात रहायला जावे पण ज्यांना त्या शहरात जास्त पगाराची नोकरी असते तेच लोक बाहेरगावाहून येवून त्या मोठ्या शहरात राहू शकतात. पण आता त्यांना देखील ते परवड नसल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या शहरातून आलेल्यांसाठी भारतातील मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू ही सर्वाधिक महागडी शहरे आहेत. दुसऱ्या देशातील नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी हाँगकाँग, सिंगापूर तसेच स्वित्झर्लंडमधील झुरिक, जिनेव्हा आणि बेसिल ही शहरे सर्वाधिक महागडी आहेत. मर्सरच्या ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे २०२३’मधून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, जगात सर्वाधिक १३ ते १५ टक्के घरभाडे वाढ मुंबईत झाली आहे. दरवर्षी यात वाढ होत आहे.
४३ शहरांमधील घरे झाली महाग
आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) चौथ्या तिमाहीत ४३ शहरांमध्ये मालमत्तांच्या किमती वाढल्या आहेत. एनएचबीने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, सर्वेक्षण केलेल्या ५० शहरांपैकी सात शहरांमध्ये घरांच्या किमती कमी झाल्या आहेत.
जीवनमान कुठे स्वस्त?
हवाना (क्युबा), कराची आणि इस्लामाबाद (पाकिस्तान), बिसकेक (किर्गिस्तान), दुसान्बे (ताजिकिस्तान).
गेल्या काही वर्षांत ग्राहकांना आपले हक्काचे घर हवे आहे. यामुळे घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय प्रशस्त घरांची मागणीही वाढली आहे.
..असे वाढले घरभाडे
रँकिंग शहर वाढ
१४७ मुंबई १५%
१८९ बंगळुरू ०८%
१६९ नवी दिल्ली ०७%
१८४ चेन्नई ०५%
२१३ पुणे ०५%
घरांच्या किमती कुठे वाढल्या?
अहमदाबाद १०.८%
बेंगळुरू ९.४%
चेन्नई ६.८%
दिल्ली १.७%
हैदराबाद ७.९%
कोलकाता ११%
मुंबई ३.१%
पुणे ८.२%

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम