औरंगाबाद दि ७ सप्टेबंर | स्मार्ट सिटी मनपा शाळांतील शिकणाऱ्या मुलांना उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत मनपाच्या ५० शाळांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
या प्रकल्पात शाळेतील गरजेची बांधकाम दुरुस्ती करण्यात येत आहे. ह्यामध्ये वॉटरप्रूफिंग, उन्हाळ्यात वर्ग तापले जाऊ नये म्हणून छतावर इंसुलेटेड पफ पैनल बसवणे, ग्रिल, दरवाजे आणि सलाईडींग खिडक्या बसवणे, वर्गाना आतून आणि बाहेरून रंगवणे याचा समावेश आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार औरंगाबाद मनपाच्या शाळांना डिजिटल करण्यात येत आहे यासाठी स्मार्ट सिटी कडून या प्रकल्पातील शाळांमध्ये प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड, व्हाइट बोर्ड, विज्वलायझर कम्प्युटर, स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत स्कॅनर व झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक साठी डेस्क आणि आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्ष अखेरपर्यंत या सर्व शाळा सुसज्ज होतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम