दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । क्रीकेटच्या दुनियेत सध्या तरी विराट कोहलीची क्रेझ ही सर्वश्रुत आहे. सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी तो एक आहे. त्याला मोठ्या प्रमाणात चाहते फॉलो करतात. T20 विश्वचषकासाठी सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि जिंकण्यासाठी खुप मेहनतही घेतांना दिसत आहे. त्याच्या संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली. एका अनोळखी चाहत्याने विराट खोलीत नसतांना पर्थमध्ये विराट कोहलीच्या खोलीत घुसून त्याच्या खोलीचा व्हिडिओ बनवला आहे. विराट कोहलीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत यास भयानक म्हटले आहे.
विराटने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले: “चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदी आणि उत्साहित होतात हे मला समजते आणि त्यांना भेटण्यासाठी उत्साहित होतात आणि मी त्याचे नेहमीच कौतुकही केले आहे. पण हा व्हिडिओ भयावह आहे आणि यामुळे मला माझ्या गोपनीयतेबद्दल खूप चिंता वाटत आहे. जर मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या खोलीत गोपनीयता ठेवता येत नसेल, तर माझ्या पर्सनल स्पेसबद्दल कुठे अपेक्षा करू शकतो? कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजनाचं साधन मानू नका.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम