आरोग्यासाठी इतकी झोप आहे महत्वाची !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मार्च २०२३ । प्रत्येक व्यकी आपल्या आरोग्याच्या बाबतीत नेहमी सावध भूमिका घेत असतात तर काही लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यातून ग्लोबलाझेशननंतर तर झोप हा विषय अधिक कळीचा मुद्दा झाला आहे.

जेव्हा कॉपोरेटाझेशन वाढू लागलं आहे आणि ऑफिस कल्चर रूजू झालं आहे तेव्हापासून जास्त वेळ काम त्यातून प्रवास आणि ताण यामुळे आपल्या सर्वांच्याच झोपेवर विपरित परिणाम होताना दिसत आहेत. उद्या आपण सगळेच वर्ल्ड स्लिप डे साजरा करणार आहोत. या दिवसाचे महत्त्व हेच आहे की लोकांना झोप आणि झोपच्या आरोग्याबद्दल जागरूक करणे हे आहे. या दिवसाचा हेतू हाच आहे की लोकांनी आपल्या झोपेविषयी अधिक जागरूक व्हावे. अपुरी झोप, इन्सोमेनिया, मानसिक ताण, टेंशन, आजार, कामाचा ताण आणि नातेसंंबंध यांमुळे लोकांचे आरोग्या बिघडू लागले आहे.

झोपेची काळजी कशी घ्याल?
आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रथम आपल्या झोपकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दिवसागणिक तुमची चिडचिड आणि अवस्थता वाढत असेल तर तुम्हाला अपुरी झोप मिळते आहे. डोळ्यावर ताण पडणे, डोकं दुखणे आणि दिवस प्रसन्न न जाणं हे प्रामुख्यानं अपुऱ्या झोपेची लक्षणं आहेत. तेव्हा अशा लक्षणांकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. तुम्हाला वेळेत झोपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही किती कामात बिझी असलात तरी तुम्हाला तुमच्या झोपेचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.

तुम्हाला किती तासांची झोप आवश्यक आहे?
तरूणांमध्ये अपुऱ्या झोपेची समस्या वाढते आहे त्यामुळे त्यांनी आपल्या झोपेचे वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. त्यातून योग्य आहार करणेही आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदल्या आहेत. तेव्हा बाहरेचे जंकफूड खाण्याचे प्रमाण त्यानंतर अल्कोहोल आणि सिगारेटमुळेही शरीरावर परिणाम होता आहे त्यात एक म्हणजे याचा परिणाम जास्त करून झोपेवर होतो आहे. तेव्हा आहाराकडे विशेष लक्ष द्या. वयस्कर आणि प्रौढ लोकांमध्येही झोपेची समस्या वाढते आहे. त्यातून स्क्रिन एडिक्शनमुळेही लहान मुलांच्याही आयुष्यात झोपेच्या तक्रारी वाढल्या आहेत.

‘हे’ तुम्हाला माहितीये का?
तुम्हाला हे माहितीये का की, 15 टक्के लोकं हे झोपेत चालतात तर 5 टक्के लोकं ही झोपेत एकटेच बोलतात. आज काल अशी अनेक लोकं आहेत ती गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ही मोडत आहेत. काहींनी जास्त वेळ झोपून तर काहींनी जास्त वेळ जागून विक्रम केलेले आहेत. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपली झोप ही कमी होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम