सिल्लोडमध्ये सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर ; मंत्र्यांनी केली हटविण्याची मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी यासाठी छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथे आज सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पिडीत आणि त्रस्त नागरिकांनी आंदोलन केले.

शिंदे गटातील आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर इत्यादी जवळपास 60 ते 70 लोकांनी अब्दुल सत्तार यांच्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला वाचा फोडत आज तीव्र आंदोलन केले.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी प्रतिकिया दिली आहे. अब्दुल सत्तार मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा. गोरगरीब यांच्या जमिनी हडपणे, वाळू तस्करी करणे, जमीन न दिल्यास बळजबरीने जमीन हडपण्याचे काम सत्तार यांनी केला असल्याचा आरोप यावळी करण्यात आला. तसेच राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा कोणी मंत्री असेल तर ते अब्दुल सत्तार आहेत असा आरोप देखील आंदोलकांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम