उद्या होणार सूर्यग्रहण पण भारतात नाही दिसणार !
दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ । हिंदू धर्मात नेहमीच वेगवेगळ्या धार्मिक अमावास्यासह एकादशीला खूप महत्व दिले जात असते तसेच अमावास्या अर्थात गुरुवारी दि.२० एप्रिल २०२३ या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होणार असून ते भारतात दृश्यमान होणार नाही. हे ग्रहण इंडोनेशिया, फिलिपिन्स, पश्चिम ऑस्ट्रेलिया या प्रदेशात दृश्यमान होणार आहे.
ग्रहण दिसणाऱ्या भारताबाहेरील काही प्रमुख शहरांच्या स्पर्श व मोक्ष वेळा पुढीलप्रमाणे-
सिडनी स्पर्श-13:37 AEST, मोक्ष-15:18 AEST
मेलबर्न स्पर्श- 13:15 AEST, मोक्ष- 15:01 AEST
ब्रिस्बेन स्पर्श- 13:43 AEST, मोक्ष- 15:42 AEST
पर्थ स्पर्श- 10:00 AWST, मोक्ष- 12:46 AWST
जकार्ता(इंडोनेशिया) स्पर्श- 09:29 WIB, मोक्ष- 12:06 WIB
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, मग सूर्यग्रहणाचे नियम पाळावे की नाही?
भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श 20 एप्रिल 2023 च्या सकाळी 07:04 वाजता असून ग्रहणमोक्ष दुपारी 12:19 वाजता आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम भारतातील लोकांनी पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व राशी इत्यादीनुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशात विचारात घेऊ नयेत. तसेच ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशातील व भारतातील गर्भवती स्त्रियांनी देखील या दिवशी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम