सोमय्यांनी ‘त्या’ व्यवहाराची प्रत दिली उपमुख्यमंत्र्याकडे; पेडणेकर अडचणीत ?
दै. बातमीदार । ३० ऑक्टोबर २०२२ । भाजपची तोफ म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यामागे महाविकास आघाडी सरकार असतांना शिवसेनेचे राऊत यांच्यापासून ते थेट परब यांच्यापर्यत अनेक चौकशी लावल्या होत्या, त्यांनी आज पुन्हा शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे बनवून वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे गिळंकृत केले, असा आरोप आज पत्रकार परिषदत घेत भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला.आज पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी या व्यवहारातील कराराची प्रतही माध्यमांना दाखवली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पेडणेकर व कुटुंबीयांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.
किरीट सोमय्या यांनी सांगितले की, किशोरी पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे ‘एस.आर.ए’चे गाळे हडप केले. एवढच नव्हे तर बोगस बनावटी कागदपत्रे करुन गोमाता जनता येथील एसआरएचे गाळेही स्वत:च्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या नावाने करण्याचा गुन्हा केला. यावेळई सोमय्या यांनी पडणेकर यांची कंपनी व गाळाधारक संजय अंधारी यांच्यादरम्यान झालेल्या कराराची प्रतही प्रसिद्ध केली.
पुढे सोमय्या यांनी सांगितले की, कराराप्रमाणे संजय अंधारी यांना एसआरएचे गाळे वाटप करण्यात आले होते. मात्र, ६ जुलै २०१७ रोजी अंधारी यांनी ही जागा पेडणेकर यांच्या कंपनीला दिली, असे करारात दाखवण्यात आले आहे. मात्र, करारातील अंधारी यांची सही पेडणेकरांचे एकेकाळचे भाऊ सुनील कदम यांची सही सारखीच आहे. तसेच, करारामध्ये संजय अंधारी यांचा जो फोटो दाखवण्यात आला आहे, तो फोटोही सुनील कदम यांचा आहे.
म्हणजेच पेडणेकर कुटुंबीयाने स्वत:च संजय अंधारी बनवून हा गाळा ताब्यात घेतल्याचे दिसत आहे, असा आरोप पेडणेकरांनी केला. तसेच, सरकारकडे दाखल केलेल्या दस्तावेजात फसवणूक करण्यता आली आहे. त्यामुळे पेडणेकर व परिवार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सोमय्यांनी फडणवीसांकडे केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम