शिंदे गटातील आमदाराच्या मुलाने दिली व्यावसायीकाला हातपाय तोडण्याची धमकी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । राज्याच्या राजकारणात शिंदे गट उदयास आल्यानंतर आ.संजय शिरसाट हे नाव खूप चर्चेत आले होते. त्यानंतर राज्यातील मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने आ.शिरसाट हे नाराज होते. पण आता त्यांच्या मुलाचे प्रताप उघड झाले आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे गेल्या पाच वर्षांपासून थकलेले बिल मागितले म्हणून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी एका केटरिंग व्यावसायिकाला हातपाय तोडण्याची धमकी दिलीय. या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.

त्रिशरण गायकवाड असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने माध्यमांसमोर बोलताना याप्रकरणी पोलिसांकडे जाण्याचा इशारा दिलाय. या प्रकाराने पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचे नाव चर्चेत आलेय. दरम्यान, याबाबत आम्ही आमदार संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. याबद्दल त्यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार संजय शिरसाट शिंदेंसोबत गेले. ते नाना वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता मुलगा सिद्धांत यांनी दिलेल्या धमकीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. विशेष म्हणजे यामुळे शिरसाटांच्या डोक्यालाही नाहक ताप झालाय. केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना सिद्धांत शिरसाट यांनी धमकी दिल्याचे समजते. याप्रकरणी बोलताना गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2017 ला आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्या पाठोपाठ एका महिन्यानंतर आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसाची जेवणाची ऑर्डर घेतली होती. त्याचेच शिरसाट यांच्याकडे पैसे थकले होते.

त्रिशरण गायकवाड पुढे म्हणाले की, आमदार संजय शिरसाट यांचे एकूण पावणेपाच लाख रुपयांचे बिल झाले होते. मात्र, त्यातले अजून 75 हजार रुपये थकले होते. त्यांच्या एका शब्दांवर डिस्काऊंट केले. त्यानंतरही त्यांच्याकडे 40 हजार रुपये राहिले. त्यांनंतर आमदार संजय शिरसाट आणि सिद्धांत शिरसाट यांना बोललो. आमदार संजय शिरसाट 40 हजार देतो म्हणाले. मात्र, सिद्धांत भैय्यांनी 20 हजार दिले. पैसे मागितले. मात्र, हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसात जाणार आहे. विशेष म्हणजे केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड आणि आमदार संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या धमकीची ऑडिओ क्लीपही व्हायरल झालीय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम