सोनिया गांधींची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल !
दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुवारी ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
सर गंगाराम रुग्णालय ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी एस राणा यांनी सांगितले की, ‘यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना 2 मार्च रोजी चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कंसलटंट डॉक्टर अरुप बसू यांच्या निगराणीखाली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.’
राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर असताना सोनियांची प्रकृती बिघडली आहे. राहुल केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी ब्रिटनला गेलेत. तिथे व्याख्यानात बोलताना त्यांनी आपल्या फोनची हेरगिरी होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले – माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतात राजकीय नेत्यांना नेहमीच असा दबाव सहन करावा लागतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम