तारकमेहता मधील सोनुची बिकनी नदी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ ।  टीव्ही मनोरंजन विश्वात सर्वाधिक कमी वेळेत चर्चेत आलेली मालिका म्हणजे तारक मेहताचे नाव घेता येईल. एक दशकांहून अधिक काळ या मालिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेतील विविध कलाकारांचे आणि चाहत्यांचे अनोखे बॉडिंग असल्याचे दिसून आले आहे. सध्या तारक मेहतामधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी भानुशाली ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

 

 

गेल्या चौदा वर्षांहून अधिक काळ तारक मेहतानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. निधीनं या मालिकेत सोनूची भूमिका साकारली आहे. आता निधी भलतीच बोल्ड झाल्याचे दिसून आले आहे. तिच्या बोल्ड अदांनी चाहते क्लिन बोल्ड झाले आहेत. निधीच्या त्या फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या फोटोनं सोशल मीडियावर अनेकांची पसंती मिळवली आहे.मालिकेत सोनू ही भलेही मवाळ भूमिकेत दिसत असली तरी सोशल मीडियावर मात्र सोनु भलतीच बोल्ड असल्याचे दिसून आले आहे. चाहते तिच्या त्या अदांवर घायाळ झाले आहे. एकीकडे अनेक कलाकारांनी तारक मेहतामधून काढता पाय घेतल्यानंतर अजुनही काही कलाकारांमुळे हा शो लोकप्रियता टिकवून आहे. तारक मेहतामधील कलाकारांना पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम