
जळगाव जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम : ११०० हून अधिक वाहनांवर कारवाई
जळगाव जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम : ११०० हून अधिक वाहनांवर कारवाई
१३.७१ लाख दंड वसूल
जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने २४ डिसेंबर २०२५ रोजी विशेष वाहन चेकिंग मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात कडक नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत विशेष लक्ष विना नंबर प्लेट वाहने आणि अल्पवयीन चालकांवर केंद्रित करण्यात आले होते. एकूण १,१०६ वाहनांवर कारवाई करून १३ लाख ७१ हजार ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
- विना नंबर प्लेट वाहने : ४६३ प्रकरणे – ४.४५ लाख रुपये दंड
- अल्पवयीन चालक : १०७ प्रकरणे – ४.०४ लाख रुपये दंड (पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नयेत, असे पोलिसांचे आवाहन)
- इतर वाहतूक नियमभंग : ५३६ प्रकरणे – ५.२२ लाख रुपये दंड
जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. पोलीस अधीक्षकांनी अशा मोहिमा भविष्यातही नियमित राबवल्या जातील, असे सांगितले. या कारवाईमुळे वाहतूक शिस्त सुधारेल आणि अपघात कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम