हिवाळ्यात स्टाईलीश कपडे घालून रहा उबदार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  गेल्या काही दिवसपासून राज्यात हिवाळ्याचा कडाका वाढला असून प्रचंड थंडी जाणवणारच. त्यामुळे या सीझनमध्ये सगळे शरीराला सतत ऊब मिळत राहील असेच कपडे घालणं पसंत करतात. स्वेटर, कानटोपी, ग्लव्ह्ज, स्कार्फ अशा कपड्यांचा हिवाळ्यात वापर वाढतो. थंडीमध्ये अनेक मुली स्कार्फ बांधण्याला प्राधान्य देतात. पण त्यामुळे तुम्ही घातलेला ड्रेस पूर्णपणे झाकला जातो. अशात तुम्ही या स्टाईलचे स्कार्फ घेतले तर तुम्हाला ट्रेंडी लूक करत फॅशनही जपता येईल आणि सोबतच थंडीपासून बचावही करता येईल.

1. बांधणी स्टाईल स्कार्फ – बांधणी हा फॅब्रिकचा असा एक प्रकार आहे जो सहसा खराब होत नाही. अगदी आपली आई आपल्या वयाची असल्यापासून बांधणी स्टाईल सुरू आहे. तेव्हा फक्त बांधणी साड्या फेमस असायच्या, हळूहळू याचे पंजाबी ड्रेस यायला लागले आणि आता तर चक्क स्कार्फ मध्येही बांधणी स्टाईल येऊ लागली आहे. तुम्ही हा स्कार्फ आपल्या कुर्त्यासोबत किंवा स्कर्ट सोबत किंवा टॅंग टॉप आणि जीन्स सोबतही घालू शकतात.

2. बनारसी स्कार्फ – बनारसी स्कार्फ हे सध्या बाजारात खूप जास्त प्रमाणात चालणाऱ्या स्कार्फच्या प्रकारांपैकी एक आहे. साध्या कुर्त्यालाही एकदम रॉयल लूक या स्कार्फ मुळे येते. त्यामुळे हे स्कार्फ तुम्ही नक्कीच घेऊ शकतात.

3. लटकन वाले स्कार्फ – प्लेन प्रिंटेड स्कार्फ आणि दोन्ही बाजूंना छोटीशी लटकन, हे कॉम्बिनेशन सध्या खूप चालू आहे.

4. कॉटन प्रिंटेड स्कार्फ – हे स्कार्फ असे फार कानाला बांधता येतील असे नाहीयेत. तरीही मानेपासून गुंडाळून हे स्कार्फ तुम्ही घेऊ शकतात. मुळात हा कॉटनचा स्कार्फ असल्यामुळे यातून थंडीही कमी वाजेल आणि उबही भरपूर मिळेल.

5. नेकलेस पेंडंट स्कार्फ – अजून एक खूप आकर्षक वाटणारा स्कार्फ म्हणजे नेकलेस पेंडंट स्कार्फ, या स्कार्फ मध्ये आपल्या गळ्याच्या मधोमध एक नेकलेस सारखं पेंडंट असतं. आणि तुम्ही हा स्कार्फ लाँग पेंडंट म्हणून पण घालू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम