रामनवमीच्या आदल्या रात्री दगडफेक ; २० जण ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ ।  औरंगाबाद नामकरणाचा वाद अजूनही सुरु असतांना छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री समाजकंटकांनी दगडफेकसह पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स फेकल्याची घटना घडली. त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा झाला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभा यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती पण आता नियंत्रणात आहे. परिसरातील वातावरण धोक्यात आणल्याप्रकरणी 300 हून अधिक अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहितीही पोलिसांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम