वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक ; पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जानेवारी २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील हावडा इथं देशातील सातव्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं होतं. आईचे अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सेमी हायस्पीड ट्रेनच्या उद्घाटनानंतर अवघ्या चार दिवसांनी दगडफेक करण्यात आलीये.

 

ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ट्रेनचं उद्घाटन केलं, त्याच दिवशी त्यांच्या आई हिराबेन यांचं निधन झालं होतं. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.पश्चिम बंगालमधील हावडाजवळील मालदा स्थानकात ही घटना घडलीये. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी दगडफेक करण्यात आलीये. दगडफेकीमुळं रेल्वेचं मोठं नुकसान झालंय. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान मोदींनी 30 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हावडा ते न्यू जलपाईगुडीपर्यंत धावणाऱ्या देशातील सातव्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन केलं होतं. याचं दिवशी पंतप्रधान मोदींच्या आईचं निधन झालं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम