कायमचे करा वीजबिल बंद ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ । राज्यात सध्या उन्हाळा आला असून आता महावितरणची वीज सुद्धा मोठ्या प्रमाणात गुल होणार आहे. तर दर महिन्याला येणारे वीजबिल देखील तुम्हाला बंद करायचे असेल तर हि बातमी तुमच्यासाठी सद्या वीजेचे अधिक दर वाढल्यामुळे सगळ्यांना मोठा फटका बसत आहे, त्याचबरोबर भविष्यात सु्द्धा अशा पद्धतीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तुम्हाला तुमच्या घरी कायमची लाईट हवी असल्यास, तुमच्यासाठी सोलार हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं महिन्याचं लाईट बील भरावं लागणार नाही. तसेच सोलारवरती घरातील अनेक उपकरण देखील चालतात. केंद्र सरकार सोलार पॅनल अधिक लोकांना वापरावं यासाठी मदत करीत आहे. तुम्ही सोलार पॅनेल लावण्याचा प्रयत्न करीत असाल, तर सरकारची योजनेची नक्की माहिती घ्या. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या घरात किती वीज लागणार आहे, याची माहिती घ्या.त्यानुसार तुम्हाला सोलार पॅनेल लावून घ्यावा लागेल. समजा तुमच्या घरात रोज दोन किंवा तीन पंखे चालतात, एक फ्रिज आहे, सात ते आठ एलईडी ब्लब चालतात, टिव्ही, अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर, तुम्हाला सहा ते आठ युनिट वीज लागणार आहे.
तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावून तुम्हाला जितकी गरज आहे, तितकी असलेली वीज निर्माण करू शकता. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहेत. विशेष म्हणजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर ‘रूफटॉप योजना’ सुरू केली आहे.
एकदा लावलेलं सोलार पॅनेल हे २५ वर्षे सुरु राहू शकतं, त्यासाठी तुम्हाला सध्या १ लाख २० हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो. सरकारकडून तुम्हाला ४० टक्के रक्कम मिळते. त्यामुळे तुम्हाला ७२ हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.
अर्ज करण्यासाठी, Sandes App डाउनलोड करा आणि पोर्टलवर नोंदणी करा.
१) सुरुवातीला
तुमचे राज्य निवडा.
तुमची वीज वितरण कंपनी निवडा.
तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
कृपया मोबाईल नंबर टाका.
ईमेल आयडी भरा.
त्यानंतर पोर्टलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
2) दुसरी स्टेप
वापरकर्ता क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा.
फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
3) तिसरी स्टेप
डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजुरी मिळाल्यानंतर, DISCOM पॅनेलमधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित करा.
४) चौथी स्टेप
सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
५) पाचवी स्टेप
DISCOM द्वारे नेट मीटरची स्थापना आणि तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
६) सहावी स्टेप
कमिशनिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात ३० दिवसांच्या आत येईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम