समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवा ; विरोधी पक्षनेते !
बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३
गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना सर्वच विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जवळ झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची ही मालिका रोखण्यासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, समृद्धीचे काम अर्धवट असताना एन्ड टू एन्ड सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, समृद्धीत भ्रष्टाचारानेच झाला हे कोणी नाकारू शकत नाही. महामार्गाचे काम घाई गडबडीत करण्यात आले आहे. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहे. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. यात तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे समृद्धीची वाहतूक थांबवावी, समृद्धी सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे.
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री वैजापूर येथे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला.यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार घणाघात केला. समृद्धी महामार्ग शापित आहे.शेतकरी, लहान उद्योजकांचे हित देखील पाहिले नाही. जमिनी ओरबाडून घेतल्या. त्यामुळे त्या सर्व व्यक्तींचे हे श्राप आहेत. महामार्ग घाईने पूर्ण करून त्याचे क्रेडीट तुम्ही घेतले, तर आता होणाऱ्या अपघातांची जबाबदारी देखील सरकारने घेतली पाहिजे. हा महामार्ग घाईघाईने बनवून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याचे परिणाम निरपराध जनता भोगतेय, असा हल्लाबोल राऊत यांनी सरकारवर केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम