‘सुभेदार’ चित्रपटाची तुफान चर्चा ; टीझर झाला प्रदर्शित

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जून २०२३ ।  देशात अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे. काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे तर काही चित्रपट तुफान पैसे कमवीत आहे. अशातच एका चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटांची सध्या बोलबाला सुरु आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांकडूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षात रिलीज झालेले फर्जंद, पावनखिंड, फत्तेशिकस्त, शेर शिवराज या शिवराज अष्टक चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात असेल.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. अभिनेता अजय देवगणने तान्हाजीची प्रमुख भुमिका साकारली होती. दरम्यान, सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कथामकावर तेवढीच टीका करण्यात आली. मात्र आता तान्हाजी चित्रपटाला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार गड आला पण.’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपत्चाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

“आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजी मालुसरे यांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजी म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम