विद्यार्थीही कमवू शकतील हजारो रुपये ; सरकारी योजनेचा घ्या फायदा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । देशातील शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना सरकारकडून चालवली जात आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री बालक बालिका योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास सरकारकडून 10,000 रुपये दिले जात आहेत. सरकारची ही योजना केवळ दहावीच्या विद्यार्थांसाठीच असून, यात विद्यार्थांना दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची अट आहे. या योजनेतंगर्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास या विद्यार्थांना सरकारकडून ८ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात आहे. तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, कोणत्याही शाळेत किंवा कार्यालयात न जाता घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री बाल बालिका योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बिहारच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर वेबपेजवर नोंदणीपर्यायावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. नोंदणीची सर्व शहानिशा केल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक?
या योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थांना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, घराचा पत्ता, बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर गोष्टी असणे आवश्यक आहे.

कोणाला करता येणार अर्ज
अर्ज करणारा विद्यार्थी बिहार राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तो यूपी किंवा इतर कोणत्याही राज्यातील असेल आणि बिहारमधून शिक्षण घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच अर्जदाराचे लग्न झालेले नाही, अशी अटही सरकारने घातली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम