त्रिमुर्ती फार्मसी कॉलेजातील विद्यार्थानी घेतली औद्योगिक क्षेत्रातील धडे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ फेब्रुवारी २०२३ । जळगाव – धुळे महामार्गावर असलेल्या पाळधी येथील नामांकित संस्था त्रिमुर्ती फार्मसी कॉलेजची चंदीगड, कुलु, मनाली येथे नुकतीच औद्योगिक सहल मोठया उत्साहात पार पडली. आठ दिवसाच्या या सहलीमध्ये ७० विद्यार्थीनी सहभाग घेतला व सोबत पाच शिक्षक होते.

या सहली दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी कवाड़ लाइफ सायन्स व आय एन डी स्विफ्ट लॅब दोन मोठ्या कंपन्याना भेट दिली व सर्व कामकाजचे धडे घेतले. शिक्षणासोबत मोठ्या कंपन्यांचे कामकाजचे अनुभव खूप शिकण्यासारख होते. अशी प्रतिक्रिया सर्व विद्यार्थिनी दिली. दरम्यान सहली मध्ये सर्वांनी कुलु मनाली, चंदीगड सारख्या पर्यटन स्थळना भेट देऊन आनंद लुटला.

अध्यक्ष मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सहली मध्ये राकेश गुजर, उमेश महाजन, कुलदीप पाटील, उमर शेख व श्वेता पाटील हे शिक्षक सोबत होते तसेच ही सहल जळगांवतिल नामांकित कंपनी ट्रॅव्हल एन जॉय याच्या सहकार्याने पार पडली अध्यक्ष श्री. मनोज पाटील सरांनी ट्रॅव्हल एन जॉय कंपनीचे संचालक श्री. सचिन पाटील यांचे कौतुक केले व त्रिमुर्ती संस्थेची परदेशातही सहल काढु असे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम