मुख्यमंत्र्यांना दाखविले विध्यार्थानी काळे झेंडे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ डिसेंबर २०२२ । राज्यात सत्ताधारी गटातील नेते मंडळी विविध टीका टिपणी करून आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे तर दुसरी कडे राज्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र जालण्यात पाहायला मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाने नागपूर गाठले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. दरम्यान विद्यार्थी प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. जालन्यातील जामवाडी जवळ जमावाने एकत्र येऊन काळे झेंडे दाखवले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. दरम्यान अप्लसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे आणि कामगार आघाडीचे कार्यकर्ते होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम