
दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ जळगाव शहरातील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटने केशवस्मृती सेवा समूह संचालित श्रवण विकास मंदिर या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील तीन क्लास रुमचे डिजीटलायझेशन करुन दिले. सावखेडा येथील शाळेत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास रोटरी इलाईटचे अध्यक्ष डॉ.पंकज शाह, मानदसचिव निलेश झंवर, प्रकल्प प्रमुख डॉ.वैजयंती पाध्ये, तनुजा महाजन, आनंद पलोड, मुख्याध्यापक पद्माकर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे शाळेतील मूक व कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या श्रवण व बोलणे आणि शिकण्यासाठी खूप उपयोग होणार असून त्यासाठी सुमारे एक लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे. त्यासाठी रोटरी इलाईटच्या सदस्या तनुजा महाजन व परिवार आणि आनंद पलोड यांनी मातोश्री जमनाबेन पलोड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य केले. यावेळी रोटरी इलाईटचे माजी अध्यक्ष नितीन इंगळे, अजित महाजन, सुनील महाजन, शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, देणगीदारांचे कुंटुंबीय आदींची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम