प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार ‘सुभेदार’

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू आहे. त्यात आता ‘सुभेदार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या दमदार सिनेमांनंतर दिग्दपाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टकातील पाचवं पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागचे चारही सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. अनेकांनी सिनेमाचं कौतुक केलं. त्यानंतर आता सुभेदार या सिनेमाची घोषणा करताच प्रेक्षकांनीही सिनेमाप्रती उत्सुकता दाखवली आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील ‘शिवराज अष्टक’ या शिवचरित्रावरील सिनेमा श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे दिग्पालच्या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. ही उत्सुकता आता संपली असून ‘सुभेदार’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी जून 2023मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा… ‘सुभेदार’ अशी या चित्रपटाची अतिशय समर्पक टॅगलाईन आहे. ‘सुभेदार’ या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम