ख्वाजामियां दर्गा, मस्जिदच्या समस्या सोडवण्यासाठी लेखी निवेदन सादर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । शंभर वर्षापासून अस्तित्वात असलेल्या जळगाव शहरातील ख्वाजामियाँ दर्गा मध्ये मागील ३२ वर्षापासून मस्जिद असून त्या ठिकाणी भाविक व नमाजी लोक हे दर्ग्यावर आले असता नमाज पठण करतात. त्यापूर्वी ते स्वच्छतागृहाचा वापर करून वजू (हात पाय धुणे) सुद्धा करतात, परंतु सदर स्वच्छतागृह हे चार-पाच दिवसांपासून अचानकपणे पत्रा ठोकून बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे नमाजी व भाविक यांना स्वच्छतागृह वापरता येत नाही. कारण ते तुटून पडले की तोडण्यात आले हा चौकशीचा विषय आहे, परंतु स्वछतागृहाकडे जाणाऱ्या दरवाज्याला पत्रा लावून बंद केलेले आहे, असे शेजारी राहणारे अडव्होकेट रहीम पिंजारी यांनी बंद केलेले असल्याचे ट्रस्टनी सांगितले.

याबाबत ख्वाजमियाँ दर्गा विश्वस्त मंडळाने १७ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु तीन दिवस होऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने सदर प्रकरणी जळगाव शहरातील काही नागरिकांनी एकत्रित येऊन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वछतागृह व पाण्याचा निचरा त्वरित सुरू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अन्यथा भाविक व नमाजी यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. सदर निवेदनाची प्रत ही मा. पोलीस अधीक्षक, मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष वक्फ मंडळ यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे.

या निवेदनावर नगरसेवक सुरेश माणिक सोनवणे, माजी नगरसेवक तथा महानगर अध्यक्ष शिवसेना जाकीर खान रसूल खान पठाण, जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, हुसेनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, एमआयएम चे उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव रय्यान जहागीरदार, शिवसेनेचे शेख इक्बाल युनूस, खाजा मिया ट्रस्टचे नासिर खान अकबर खान तडवी व शौकत खान अफजल खान, एमआयएमचे सद्दाम खान रसूल खान व शेख शाकीर अजीज, इकबाल युनूस, मुन्ना शेख हनिफ, हारून खान हमीद खान, नदीम शेख नईम, वसीम शेख अब्दुल रहीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम